माझा सायकल प्रवास

 


            आज शनिवार 27 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी सायकलिंग करण्याचा

 मनात विचार आला आणि बरेच दिवस घरात धूळ खात पडलेली सायकल

 बाहेर काडून स्वच्छ  करण्यात आली दोन्ही चाकात हवा मारून

 सायकलींचे प्रवासाला सुरुवात केली पहिलाच दिवस असल्याने जमेल का

 नाही या विचारानेच वारणानगर पासून न्यू इंग्लिश स्कूल माले पर्यंत

 सायकल प्रवास केला हा प्रवास करत असताना जुन्या आठवणींना

 उजाळा मिळाला वारणानगर ते माले हायस्कूल हा चार-पाच

 किलोमीटरचा प्रवास करत असताना हात पाय भरून आलेत पायात गोळे

 येवू लागले आणि मग मनात विचार आला तर याच मार्गाने लहानपणी

 म्हणजे 1987 झाली जाफळे ते कोडोली हायस्कूल असा दररोजचा प्रवास

 न थकता होतं होता त्यावेळी रस्ता पूर्णपणे कच्चा होता पण आज कोडोली

 ते जाफळे फाटा एक पर्यंत रस्ता डांबरी आहे डांबरी रस्ता असून दे की

 थोडेसे प्रवासाने पहिल्याच दिवशी थोडा थकवा जाणवला आणि मग

 विचार आला त्या वेळेचा प्रवास हा शाळा शिकण्याचे ओडीने कदाचित

 होत असावा 1987 कोडोली हायस्कूल येथे इयत्ता आठवी ला प्रवेश घेतला

 पण शाळेत येण्यासाठी गावावरून वेळेत एसटी नव्हती त्यामुळे शाळेला

 जायचं तर सायकल घेणेच पर्याय नव्हता त्या बालवयात कधी एकटे तर

 कधी डबल असा शाळेचा प्रवास सायकलवरून होता पण ती सायकल

 मारत असताना विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असायची तिथे कधी थकवा

 जाणवतच नाही आज कदाचित वयाची पन्नाशी गाठली त्यामुळेच हा

 थकवा जाणवला असेल पण सायकल चालवण्याची आनंद हा त्यावेळी

 प्रमाणेच आजही जाणवला त्यावेळी शाळेला जाण्यासाठी हरकुलस

 कंपनीची 24 इंची सायकल भावाने घेऊन दिली होती अच्छी फॅन्सी

 सायकल आणि त्यावेळची साधी सायकल सायकल चालवताना तफावत

 आपल्याला जाणवते खरंच ते दिवस खूप आनंदाचे होते जाफरे गावातून

 कोडोली ला प्रवास करत असताना कच्च्या रस्त्यातून सायकलचे पार्ट कधी

 न्यूज व्हायचे हे कळायचे नाही काहीवेळा मार्ग सायकल पंचर झाली तर

 एक तर मालेगावात पंचर काढून घ्यायचे नसेल घरात जाऊन स्वतः पंचर

 काढायला लागायचे सायकल पंक्चर झाल्यामुळे शाळेला दांडी पडू नये

 म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना पंचर काढण्याचे साहित्य घरामध्ये आणून

 ठेवलेलं होतं स्वतः पंचर काढणे स्वतः सायकला तेल घालने एवढेच नव्हे

 सचिन घालण्यापर्यंत काम त्या लहान वयातच आम्हाला शिकवले गेलं होतं

 आणि त्यामुळे शाळेचा प्रवास सायकलवर करत असताना कधीच थकवा

 जाणवत नव्हता मोठ्या उत्साहाने जाफळे ते कोडोली हायस्कूल पर्यंतचा

 प्रवास दहा बारा किलोमीटर हा आनंदाने आम्ही मुले पार करत असे

 सायकलवर प्रवास केला म्हणून कधी अभ्यासात कुचराई  केली जात नसे

 पण आज विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत शाळेच्या गाड्या येतात घरपोच सेवा

 दिली जाते. तरीदेखील विद्यार्थ्यांचा अभ्यास  अपूर्णच असतो कदाचित

 याला टीव्ही ,मोबाइल ,याचाही परिणाम  असेल.

Comments