बुद्धिमत्ता - आकलन
इंग्रजी अक्षरमाला 2) शब्दमाला ३) अंकमाला 4) संख्यामाला 5) चिन्हमाला
6 )माहिती आकर
घटक
इंग्रजी अक्षरमाला
अक्षरमाला ABCDE FGHIJ
KLMNO PORST UVWXY
अक्षरमालेत 5-5 अक्षरांचे पाच गट दिले
जातात. एकूण 25 अक्षरे असतात. अक्षरमाला डाकडून मोजल्यास A
चा क्रमांक 1 ला व Y चा क्रमांक 25 वा येतो. तर उजवीकडून मोजल्यास Y चा क्रमांक 1 ला व A चा क्रमांक 25 वा येतो. या प्रकारच्या प्रश्नात दोन अक्षरांतील अंतर, गटांमधील अक्षरे किंवा अक्षरमालेतील डावीकडील किंवा उजवीकडील विशिष्ट
क्रमांकाचे अक्षर कोणते या प्रकारचे प्रश्न विचारले जातात.
नमुना प्रश्न
1) दिलेल्या अक्षरमालेत N च्या डावीकडील दहावे अक्षर कोणते ?
1) E 2) C
3) D 4) Y 1
2 3 4 --उत्तर _--(3)
स्पष्टीकरण : Nच्या डावीकडील पहिले अक्षर M आहे म्हणून दहावे अक्षर D आहे. म्हणून उत्तराच्या
हा 3 अंक ठळक
केला आहे.
2) अक्षरमालेत डावीकडून कोणत्या
क्रमांकाची अक्षरे घेतल्यास CAT हा शब्द तयार होतो ?
1) 4-2-20 2) 3-1-20 3) 3-15-20
4) 23-25-20 1 3 4
स्पष्टीकरण : अक्षरमाला डावीकडून मोजल्यास A चा क्रमांक पहिला येतो व
त्यानुसार 3-1-20 क्रमांकांनी CAT हा शब्द तयार होतो. म्हणून 2 हा अंक ठळक केला आहे.
सराव प्रश्न
अक्षरमाला - ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
1. दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून पंधराव्या
अक्षराच्या उजवीकडील आठवे अक्षर कोणते?
1) x 2) V
3) w 4) U
2. दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून आठव्या अक्षराच्या
उजवीकडील पाचवे अक्षर कोणते ?
1) N 2) 0 3)
L 4 ) M
3.दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास GOD हा शब्द तयार होतो?
1) 9-11-12 2) 7-15-4 3) 4-7-15 4) 4-15-7
4. दिलेल्या अक्षरमालेतील
अक्षरांना डावीकडून चढत्या क्रमाने क्रमांक दिल्यास फळांच्याराजाच्या नावामधल्या
अक्षराचा क्रमांक कितवा ?
1) 13 2) 14 3) 15
4) 12
5. दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून 17 व्या अक्षराच्या डावीकडील सहावे अक्षर कोणते ?
1) V 2) U 3
) L
4 ) K
6) दिलेल्या अक्षरमालेतील शेवटून 16 व्या अक्षराच्या उजवीकडील 8 वे अक्षर कोणते ?
1) T 2) R
3) A 4) S
7. दिलेल्या अक्षरमालेतील बरोबर मध्यभागी येणाऱ्या
अक्षराच्या डावीकडील सातवे अक्षर कोणते?
1) H 2) J 3) G 4) F
8.
दिलेल्या
अक्षरमालेतील R
ते Y मधील अक्षरांची
संख्या किती?
1)
8 2) 10 3) 7
4) 9
9 . दिलेल्या अक्षरमालेतील दुसऱ्या गटातील दुसरे आणि शेवटच्या
गटातील तिसरे अक्षर यांच्या मधोमध कोणते
अक्षर येईल?
1) P 2 ) M 3) O 4) N
10. दिलेल्या अक्षरमालेतील 15,20,16 व्या क्रमांकाच्या अक्षरांनी कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल ?
1)TOC 2) TAP
3) POT 4) OTS
उत्तरे खालीलप्रमाणे
1 – 3 , 2 -4 , 3 – 2, 4 – 2,
5 – 4 , 6 – 2 ,
7 -4 , 8 – 1, 9 – 3, 10
– 3
Comments
Post a Comment