ज्ञान व आचरण

 ज्ञान व आचरण


    आचार्य बहुश्रुती यांच्या आश्रमातील तीन शिष्यांचे अध्ययन पूर्ण झाले. त्यांनी आचार्यांना गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची परवानगी मागितली. तथापि त्यांची योग्यता तपासून पाहिल्या शिवाय आचार्य परवानगी देईनात. त्यांनी तिघा शिष्यांची परीक्षा घेण्याचे ठरविले.

    त्यांनी आश्रमाच्या प्रवेशद्वारात काटे पसरले. तिघांना बोलवून म्हणाले, " बाळांनो,  आश्रमाबाहेरुन थोडी लाकडे आणून आत नेऊन ठेवा. " तिघेही उठले. तिघांनाही काटे बोचले  पहिल्याने पायातले काटे काढले. तिथेच टाकले व पुढे गेला. दुसऱ्याने काटे पाहिले व बाहेर कसे  जायचे हा विचार करत नुसता बसून राहिला. तिसऱ्याने मात्र ते काटे पाहाताच झाडू आणू एकत्र केले व लांब नेऊन टाकले नंतर लाकडे आणून व्यवस्थित रचून ठेवली.

    दुसऱ्या दिवशी आचार्यांनी तिघांना बोलवून घेतले. पहिल्या दोघांना तिथे आनखी काही दिवस राहायला सांगितले. तिसऱ्याला मात्र गृहस्थाश्रम स्वीकारण्याची परवानगी दिली.

    " जोपर्यंत शिक्षणाचा उपयोग प्रत्यक्ष व्यवहारात करत नाही तोपर्यंत ते पूर्ण होत न विचारविना आचार पूर्ण आंधळा असतो तर आचारविना विचार पांगळा असतो. शिक्ष आचार-विचार, उक्ती कृती, ज्ञान व्यवहार, तत्त्वज्ञान व जीवन यात समन्वय साधा नसतो. केवळ ग्रांथिक ज्ञान उपयोगाचे नाही. " असे सांगून तिसऱ्या शिष्याला निरोप दिल

Comments