गर्वाचे घर खाली
अकबर बादशहाला आपल्या सम्राटपदाचा गर्व झाला होता. एकदा त्याच्यापाशी एकदा त्याच्यापाशी एकटा बिरबलच असताना बादशहाणे त्याला विचारले, "बिरबल, या जगात माझ्यापेक्षा कुणी श्रेष्ठ आहे का?" बादशहाला 'ग' ची बाधा झाली असल्याने पाहून, अगोदर याला हरभऱ्याच्या झाडावर चढावे व मग शुद्धीवर आणावे, या विचाराने तो अगदी खरेपणाचा भाव चेहऱ्यावर आणून म्हणाला, "खाविंद, असा प्रश्नच विचारणे, वावगे आहे. अहो आपण या जगातील कुठल्याही माणसापेक्षा तर श्रेष्ठ आहातच, पण माझ्या दृष्टीने आपण प्रत्यक्ष त्या परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहोत. कारण जी गोष्ट करणे त्या परमेश्वराला जमत नाही ती गोष्ट आपण सहज करू शकतात."
बिरबल अगदी मनापासून बोलत आहे असे वाटल्यामुळे बादशहाने मोठ्या शुषीत येऊन त्याला प्रश्न केला. "बिरबल त्या अल्लालासुद्धा करता ण येण्यासारखी कोणती गोष्ट मी करू शकतो?"
बिरबल म्हणाला,"हुजूर, आपण एखाद्याला शिक्षा देण्याचे मनात आणलेत, तर त्याला आपल्या राज्याबाहेर आपण घालवून देऊ शकता. पण परमेश्वराला ते शक्य होत नाही. कारण त्याचे सर्व विश्वावर राज्य आहे. बिरबलाच्या या उत्तराने बादशहाला झालेल्या गर्वाचे घर एकदम खाली आले आणि त्याच्यात नम्रत्व आले.
तात्पर्य- गर्व झाल्यावर अखेर लज्जित होण्याची पाळी येते.
Comments
Post a Comment