इंग्रजी भाषेचे महत्त्व
[ मुद्दे :
इंग्रजीचे जागतिक स्थान- जगात हिंडताना इंग्रजी हवे - जागतिक साहित्य, ज्ञान इंग्रजीतून - मातृभाषेतील ज्ञान, साहित्य इंग्रजीद्वारे जगापुढे आणणे आवश्यक. ]
मराठी माध्यमांच्या शाळांत इंग्रजी शिकवावे का? हा नेहमीच्या चर्चेचा विषय आहे. अगदी पहिल्या इयत्तेपासून इंग्रजी शिकवल्यास दोन्ही भाषा कच्च्या राहतील का ? आजकाल बरेच पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. हे बरोबर आहे का ?
प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतूनच शिकावे, हेच योग्य. तरीपण इंग्रजी भाषेची ओळख हवीच. कारण आज ती जागतिक भाषा आहे. जगात आपण कोठेही गेलो तरी इंग्रजी येत असेल, तर काहीही अडत नाही. इंग्रजी भाषेत विपुल साहित्य आहे. विज्ञान, तंत्र, आरोग्य या क्षेत्रांतील सर्व प्रगत ज्ञान इंग्रजी भाषेत आहे. ते समजून घेण्यासाठी इंग्रजी भाषेचे अध्ययन आवश्यक आहे.
इंग्रजी भाषेतील हे अनमोल ज्ञान आपण आपल्या भाषेत आणले पाहिजे. आपल्या भाषेती
ल उत्कृष्ट साहित्य इंग्रजीत
नेले पाहिजे. वंगकवी रवींद्रनाथ टागोर यांच्या कविता बंगालीतून इंग्रजीत
नेल्यामुळेच रवींद्रनाथांना जागतिक कीर्तीचे नोबेल पारितोषिक मिळाले. अशा या
इंग्रजीपासून दूर राहून कसे चालेल ?
Comments
Post a Comment