संवेदनशीलता
अलीकडे
स्वतःच्या सुखाबद्दल प्रत्येक जण जागरूक असतो; पण इतरांबाबत मात्र 'मला काय करायचंय!' असा विचार केला जातो. असा विचार करणे आपल्या आणि समाजाच्या
दोघांच्याही हिताचे नसते. संवेदनशीलता ही एक भावना आहे. संवेदनशीलता म्हणजे आपल्या
भोवतालच्या सर्व गोष्टींबद्दल वनस्पतीस पशू, नदी, भोवतालची
माणसे,
पर्यावरण याबाबत मनाच्या हळुवारपणाची स्वागतशीलतेची, उदारतेची भावना. गौतम बुद्धांना समाजातील अनाचार, दुःख अत्याचार, दैन्य पाहून नवा धर्म स्थापन करावासा वाटला; पण अगदी आजच्या काळातले एक उदाहरण वृत्तपत्रात वाचण्यात
आले.
प्रियदर्शिनी
मट्टू ही दिल्ली विश्वविद्यालयात शिक्षण घेणारी एक विद्यार्थिनी. तिला सीनिअर
असणाऱ्या संतोषकुमारच्या मनात ती भरली. त्याने तिला वश करण्यासाठी जंग जंग पछाडले;
पण ते शक्य झाले नाही, तेव्हा तिचा खून करण्यात आला. न्यायाधीशासह सर्वांना
संतोषकुमार सिंहनेच हे
कृत्य केले असल्याची खात्री असूनदेखील ठोस पुराव्याअभावी तो निर्दोष सुटला.
आदित्यराज कौल या दिल्लीत बारावीत शिकणाऱ्या मुलाच्या जेव्हा याबद्दलचा
प्रियदर्शिनीच्या वडिलांचा लेख वाचनात आला, तेव्हा. त्यांच्या वेदनेने तो भयंकर अस्वस्थ झाला. त्याने
इंटरनेट आणि ब्लॉगच्या माध्यमातून या अन्यायाविरुद्ध एकत्र येण्यासाठी लोकांना साद
घातली. त्यानंतर वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी प्रियदर्शिनीवर झालेल्या
अन्यायविरुद्ध जोरदार आवाज उठवून आदित्यच्या प्रयत्नांना भरभक्कम पाठिंबा दिला. मग
या अन्यायाविरुद्ध देश-परदेशांतूनही प्रचंड प्रतिसाद लाभला. सह्यांची मोहीम सुरू
झाली. न्यायव्यवस्थेला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. आदित्याच्या हातून एक
असामान्य गोष्ट घडली. एका प्रियदर्शिनीलाच नव्हे तर समस्त भारतीय स्त्री जातीला
न्याय मिळवून देण्याची! संवेदनशीलतेचे हे सत्य आणि बोलके उदाहरण आपल्याला प्रभावित
करते.
Comments
Post a Comment