अण्णा हजारे जन्मदिन १५ जानेवारी
ज्यांच्या
मौन स्वीकारण्याने किंवा उपोषण करण्याने राज्य सरकारलाही धडकी भरते त्या
राळेगणसिद्धीच्या साध्यासुध्या दिसणाऱ्या अण्णा हजारेंचा जन्म १५ जानेवारी, १९४० मध्ये झाला. आत्याजवळ मुंबईत ते ७ वीपर्यंत शिकले व
फुलाच्या दुकानात काम करू लागले. नंतर ते लष्करात भरती होऊन ट्रकने आपल्या
सैनिकांना रसद पुरवू लागले. एकदा पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात नशिबाने अण्णा
बचावले. तेव्हा पुढील आयुष्य समाजसेवेसाठी खर्च करण्याचे त्यांनी ठरवले.
स्वामी
विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव पडल्यामुळे अण्णांनी लष्करी नोकरीला रामराम ठोकला
व राळेगणसिद्धीला परत आले. पण घरी न जाता गावातल्या यादवबाबा मंदिरात राहून तेथील
समाधीचा जीर्णोद्धार केला. गावकरी जमू लागले. अण्णांचे विचार त्यांना पटू लागले.
मग अण्णांनी गावातल्या हातभट्ट्या, भांडणतंटे, हाणामाऱ्या
बंद करण्याची मोहीम आखली. सर्वांचा पाठिंबा त्यांना मिळाल्यामुळे एकीचे बळ वाढले.
भेदभावनेची दरी मिटून। सामूहिक शेती, पाणी अडवा पाणी जिरवा, ठिबक सिंचन इत्यादी फलदायी योजना अण्णांनी गावकयांच्या
मदतीने अमलात आणल्या..
राळेगणसिद्धीच्या
विकासतंत्राचा उपयोग इतर गावांनाही होऊ लागला. व्यसनाधीनता, वृक्षतोड, भाडणे याचे
दुष्परिणाम जाणून गावे परस्पर सहकार्याने वागू लागली. अण्णांच्या 'हिंद स्वराज ट्रस्ट' संस्थेमुळे गावांची चळवळ बाढून गावकरी आपल्या गरजांसाठी, आर्थिक बाबींसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतीद्वारे आपली बाजू मांडून न्याय मिळवू लागले.
अण्णा खडतर प्रसंग व विरोधकांना न जुमानता गावकऱ्यांसाठी लढत राहिले. अण्णांच्या
नेतृत्वाखाली साडेतीनशे गावात त्यांच्या आदर्शाचा मंत्र पोहोचला. हा बदल
पाहण्यासाठी महाराष्ट्रातून, परराज्यातून
ग्रामस्थ आले आणि आपापल्या गावांचा कायापालट त्यांनी घडवून आणला.
जनतेच्या
विविध विकास प्रकल्पांना व राबवणाऱ्या नोकरशाहीला लागलेली भ्रष्टाचाराची कीड
अण्णांच्या नजरेतून सुटली नाही. युती सरकारमधील काही मंत्र्यांची भ्रष्ट नीती नष्ट
करण्यासाठी अण्णांनी उपोषणाचे आंदोलन छेडले. भ्रष्ट मंत्र्यांनी राजीनामा दिला
पाहिजे,
ही सातत्याने त्यांनी मांडलेली मागणी पूर्ण झाली तेव्हाच
त्यांनी उपोषण सोडले. नंतर गावोगाव भ्रष्टाचार निर्मूलन समित्या स्थापन झाल्या नि
लोकशक्तीने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.त्यानंतर आमदार खासदारांसारख्या मंत्र्यांना
असणारे माहिती मिळवण्याचे अधिकार सर्व नागरिकांनाही मिळायला हवेत, यासाठी मौन-उपोषणाच्या अस्त्रांनी जिकीरीचा लढा दिला. अखेर
राष्ट्रपतींनाही वटहुकूमावर सही करावी लागली आणि १२ ऑक्टोबर २००५ पासून माहितीच्या
अधिकाराचा कायदा अस्तित्वात आला. त्यामुळे कोणताही नागरिक आता सरकारकडे हवी ती
माहिती हक्काने मागू शकतो. निष्कलंक चारित्र्य, पारदर्शी वागणूक असणाऱ्या या साध्या अण्णा हजारेंनी आपल्या
आंदोलनातून माणसांना नवी उमेद व जिद्द दिली. त्या अण्णांना सादर प्रणाम!
Comments
Post a Comment