उत्कृष्ट संभाषण कौशल्य
मराठीमध्ये एक म्हण आहे की बोलणाऱ्यांची माती खपते पण न बोलणाऱ्याचे सोनेसुद्धा खपत नाही. जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी उत्कृष्ट संभाषण कौशल्य असणे अतिशय आवश्यक आहे. जो मनुष्य आपले मत सहजपणे समोरच्याला समजावू शकतो तो इतरांपेक्षा सरस असतो. तो त्याच्या व्यवसायामध्ये इतरांपेक्षा एक स्टेप पुढे असतो. कारण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी इतरांचे सहकार्य,
संपर्क,
संबंध गरजेचे असतात. दोन व्यक्तींचा संपर्क आल्याशिवाय व्यवहार होत नाहीत.
दोन किंवा दोनपेक्षा जास्त माणसांमधल्या संवादाला संभाषण असे म्हणतात. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. रोजचे जीवन जगताना आपला समाजातील लोकांशी संबंध येत असतो. त्यांच्याशी संवाद साधला जातो. लोकांशी होणारा संवाद हा सुसंवाद होण्यासाठी संभाषण कौशल्याची गरज असते. जर आपल्याला संभाषण कौशल्य चांगले ठेवता आले तर जीवनात यशस्वी होण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागणार नाही.
कोणतीही भावना व्यक्त करण्यासाठी,
विचार मांडण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी भाषेची गरज असते असे नाही. भाषेशिवायही आपण इतरांशी संवाद साधू शकतो. एखाद्याबद्दल आदर दर्शवण्यासाठी,
सहमती दर्शवण्यासाठी,
विरोध दर्शवण्यासाठी,
आपले मत प्रकट करण्यासाठी,
विशिष्ट हावभाव देहबोलीतून करता येतात. पण ते अधिक प्रभावी होण्यासाठी भाषेचा उपयोग होतो. तरीही नुसतंच बोलता येणे यापेक्षा प्रभावीपणे बोलता येणे ही आज काळाची गरज आहे. इतरांपेक्षा उत्कृष्टपणे मत आणि विचार बोलण्यासाठी काही कौशल्ये आत्मसात करावी लागतात त्यालाच संभाषण कौशल्य असे म्हणतात.
ज्याप्रमाणे आपण बोलून एखाद्याशी संवाद साधतो त्याप्रमाणेच आपली देहबोलीही आपल्या मनातील भावना आणि आपले विचार व्यक्त करत असते. तुम्ही एखाद्या कार्यक्रमात लोकांच्यामध्ये राहून गप्प जरी राहिलात तरी तुमची देहबोली आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असते. समोरच्या वातावरणात कळत नकळतपणे संकेत पाठवत असते. अनेकवेळा एखाद्या प्रसंगाबाबत काहीही न बोलता समोरची व्यक्ती आपल्याबाबत काहीतरी समज किंवा गैरसमज करून घेत असते. त्याचे कारण आपली देहबोलीच असते,
म्हणून संभाषण कौशल्यामध्ये देहबोलीला अतिशय महत्त्व आहे. एखादी व्यक्ती ज्या पद्धतीने चालते,
वागते,
हातवारे किंवा हावभाव करते त्यावरूनच त्या व्यक्तीची वैचारिक पातळी आणि व्यक्तिमत्त्व यांची कल्पना येत असते. म्हणूनच संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी शब्द आणि भाषा याबरोबरच हावभाव,
देहबोली,
शिष्टाचार या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत.
आजच्या युगात नोकरी,
व्यवसायामध्ये प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये इतरांपेक्षा सरस ठरण्यासाठी संभाषणकौशल्य विकसित करावेच लागेल. मार्केटिंग क्षेत्रात इंटरव्ह्यूवमध्ये,
मिटींग्जमध्ये,
गुंप डिस्कशनमध्ये,
सेमिनार्समध्ये आत्मविश्वासाने बोलता यावं लागतं.
Comments
Post a Comment